अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर

0

पुणे ः सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. आशिया खंडातील फक्त ६ व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे. त्यात अदर पुनवाला यांच्या नावाचा समावेश आहे.

करोना महामारीच्या विरोधात दिलेल्या लढ्यात अदर पुनावाला यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस निर्मित कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. करोनाची लस तयार करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश स्वीडन फार्मा कंपनी अस्ट्रा जेनेका यांच्या मदतीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ‘कोविशिल्ड’ नावाची लस तयार करत आहे. सद्या त्याची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.

अदर पुनावाला यांच्या व्यतिरिक्त चिनीसंशोधक झॅंग योंगझेन, चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डाॅ. रुईची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग, कोरियाचे उद्योग सिओ जुंग जिन यांचादेखील पुरस्कार सन्मान दिला आहे. या सर्वांचा ‘व्हायरस बस्टर्स’, असा उल्लेख केला आहेय

Leave A Reply

Your email address will not be published.