”आता अंहिसेच्या मार्गाने आंदोलन चालणार नाही”
केंद्राला शेतकऱ्यांचा इशारा ः कॅनेडाच्या पंतप्रधानांचे मोदींना पत्र
नवी दिल्ली ः कृषी कायद्यांचा फायदा शेतकऱ्यांना नाही, तर केंद्राला होणार आहे. आम्हाला काॅर्पोरेट फार्मिंग करायचंच नाही. कृषी कायदे रद्द व्हावेत, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. आम्ही आतापर्यंत अंहिसेच्या मार्गावर चालत होतो, आता अंहिसेच्या मार्गावर चालणार नाही, हे सरकारेने लक्षात घ्यावं”, अशा इशारा शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला दिलेला आहे.
नरेंद्र सिंह तोमर यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या लहान मुले आणि महिलांना घरी जाण्याचे आवाहन केले. मात्र, शेतकरी दिल्लीत आपल्या आंदोलनावर ठाम आहे. विशेष म्हणजे कॅनेडाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची विचार करा, असं पत्र मोदी सरकारला लिहिलं आहे. ”कॅनेडामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा होऊ शकते. मग भारताच्या संसदेत का नाही”, असा प्रश्न जमहुरी किसान सभेचे जनरल सेक्रेटरी कुलवंत सिंग सिंधू यांनी उपस्थित केला आहे.
मागील ९ दिवसांपासून दिल्लीमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशमधील शेतकऱ्यांनी केंद्राने बनविलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. लाठीचार्ज आणि अश्रुधूरांचा वापर पोलिसांनी केला आहे. मात्र, शेतकरी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे. चारवेळा बैठका होऊनही त्यातून काही निष्पन्न झाले आहे.