करोनाकाळात सेवाभान पाहायला मिळाला ः अरुण खोरे

परभन्ना फाउंडेशनतर्फे करोनायोद्ध्ये कृतज्ञता पुरस्कारने सन्मानित

0

पुणे : “समाजकार्याचा मोठा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यांचा वारसा कोरोना काळात अनेकांनी जपला. गांधीजींनी जशी कुष्ठरोगी परचुरे शास्त्री यांची सेवा केली, तसाच सेवाभाव या काळात पाहायला मिळाला. मानवतेचा, करुणेचा बिंदू डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी निस्वार्थ सेवा केली”, असे मत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी मांडले.

करोनाच्या कठीण काळात अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवाकार्य करणाऱ्या वैद्यकीय, पोलीस, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी अरुण खोरे बोलत होते. यावेळी ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार, मनिषा उगले आदी उपस्थित होते.

आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाने, औंध जिल्हा रुग्णालयातील डॉ. सचिन चप्पलवार, पत्रकार सागर आव्हाड, सचिन सुंबे, सुमित आंबेकर, शेख अस्लम, नरहरी कोलगाने, ओपन लायब्ररी चळवळच्या अध्यक्षा प्रियांका चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल काळे, प्रमिला लोहकरे, सुंदराबाई अंबरनाथ कोकणे, सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव, ऍड. वाजेद खान यांच्यासह करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाचाही सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक अवचार यांनी केले तर विजय गायकवाड यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.