खासदार संजय राऊत यांना विश्रांतीचा सल्ला

0

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

संजय राऊत यांना छातीत दुखत असल्याचा त्रास पुन्हा एकदा जाणवू लागल्यानं २ डिसेंबर रोजी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार दोन स्टेन हृदयात टाकण्यात आले आहेत. प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ. मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांच्या नेतृत्त्वाखाली संजय राऊत यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस संजय राऊत त्यांच्या राहत्या घरीच आराम करणार आहेत. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारात संजय राऊत रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले.

Leave A Reply

Your email address will not be published.