पेट्रोलचा भडका; दर दोन वर्षात उच्चांकी स्तरावर

0
नवी दिल्ली : देशात, राज्यात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच आहे. शनिवारी पेट्रोल दरात 27 पैशांची तर डिझेल दरात 25 पैशांची वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्‍लीत पेट्रोलचे दर 83.13 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 73.32 रुपयांवर गेले असून पेट्रोलचे दर दोन वर्षाच्या उच्चांकी स्तरावर गेले आहेत.

मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. क्रूड तेलाचे प्रति बॅरलचे दर पन्नास डॉलर्सच्या आसपास पोहोचले आहेत. या पार्श्‍वभूमीवर तेल कंपन्यांकडून दरवाढ सुरु आहे. तेल कंपन्यांनी मागील पंधरा दिवसांत 13 वेळा पेट्रोलियम पदार्थांच्या दरात वाढ केली आहे. सप्टेंबर 2018 मध्ये दिल्‍लीत पेट्रोलचे दर 83 रुपयांच्या आसपास होते.

हा दर आता गाठला गेला असून क्रूड तेल वधारले तर पेट्रोल, डिझेलच्या दरात भविष्यातही वाढ होऊ शकते. गेल्या 16 दिवसांत पेट्रोल दरात सरसकट 2.07 रुपयांची वाढ झाली असून डिझेल दरात 2.86 रुपयांची सरसकट वाढ झाली आहे.

शनिवारच्या दरवाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 89.78 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 79.93 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे हेच दर क्रमशः 84.63 व 76.89 रुपयांवर गेले असून चेन्नईमध्ये इंधन क्रमशः 86 आणि 78.69 रुपयांपर्यंत कडाडले आहे.

नोएडा, लखनौ, पाटणा येथे पेट्रोल क्रमशः 83.23 रुपये, 83.14 रुपये आणि 85.69 रुपयांवर गेले आहे. दुसरीकडे डिझेल क्रमशः 73.74, 73.66 आणि 78.57 रुपयांवर गेले आहे. चंदीगड येथे पेट्रोल 80.03 रुपयांवर तर डिझेल 73.06 रुपयांवर गेले आहे. जयपूरमध्ये हेच दर क्रमशः 90.47 आणि 82.46 रुपयांवर गेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.