संजय राऊत म्हणाले,”शरद पवारांचे बोलणे काॅंग्रेसने…”

0

मुंबई ः ”काॅंग्रेसने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे बोलणे एक मार्गदर्शन म्हणून स्वीकरले पाहिजे. आम्हीदेखील त्यांचे मार्गदर्शन घेतो. आता शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील त्यांचे मार्गदर्शन घेतात. असे सांगत संजय राऊत यांनी काॅंग्रेसला चिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नुकतेच एका मुलाखतीत काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या टिप्पणी केली होती. त्यावर काॅंग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी आपली नाराजी ट्विटरवरून व्यक्त करत महाविकास आघाडीत मित्रपक्षांनी आघाडी धर्म पाळावा, अन्यथा सरकार स्थिर राहणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत पुढे म्हणाले की, “हैदराबादमध्ये काॅंग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. निकालाची पर्वा न करता काॅंग्रेसने स्वतःला झोकून दिले पाहिजे. काम नागरिकांना दिसले की आपोआप पाठिंबा मिळतो. राहूल हे काॅंग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी काॅंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारून कामाला लागावे”, असेही मत राऊत यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.