मुंबई ः छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान आपल्या फॅमिलीसोबत मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. त्याचबरोबर आपले सुंदर फोटो चाहत्यासोबत शेअरदेखील करत आहे. मालदिवमधील तिची सुट्टी खास आनंदात साजरी होत आहे. कारण, तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केलेले फोटो पाहिले असता हिनाचा लूक चाहत्यांना खूपच आवडेले दिसत आहेत.
हिनाने आपल्या इन्स्टाग्रामवरून शूट केलेले फोटो पाहून चाहते प्रतिक्रियांचा आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. लाल, निळ्या बिकीनीवरून हिनाचे फोटो खासच आलेले आहेत. वेगवेगळ्या पोजमधील फोटो पाहून चाहते बेशुद्ध पडाचेच बाकी राहिलेले आहेत.
निळ्याशार समुद्राच्या किनारी ब्लॅंकेट पोज देताना हिना खूपच सुंदर दिसते. इतकंच नाही तर, तिच्या हातात शॅम्पेन ग्लासदेखील आहे. हिनाचे फोटो वेगात व्हायरल होत आहेत. आतापर्यंत ३ लाख काॅंमेट्स तिन ब्लॅंकेट पोजवर दिलेल्या फोटोवर घेतलेल्या आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये हिना लिहिते की, ”चिअर्स टू लाईफ”, हिनाचे हे फोटो काही मिनिटांपूर्वीच अपलोज केलेली आहेत. तिच्या या फोटोवर काॅमेट्स करताना चाहते दमत नाहीयेत. हिनाने आणखी काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे, तेदेखील पाहण्यासारखे आहेत.