शेतकऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचा पाठिंबा
शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी घेतली मुख्यमत्र्यांची भेट
नवी दिल्ली ः शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. शेककरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अकाली दलाच्या नेत्यांना दिले आहे.
अकाली दलाच्या नेत्यांनी दिल्यानंतर सांगितले की, ”शेतकऱ्यांना आपला पाठिंबा असणार आहे. दोन आठवड्यानंतर होण्याऱ्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.” अकाली दल आणि शिवसेना एनडीएममध्ये मित्रपक्ष होते. त्यामुळे त्यांच्या मित्रत्वाचे संबंध आहेत.
सद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएतून बाहेर निर्णयावर अकाली दल पोहोचला आहे. त्यामुळे एनडीएतून बाहेर पडलेली शिवसेना आणि अकाली दल केंद्राच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे. मागील १० दिवसांपासून दिल्लीमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात केंद्र सरकारविरुद्ध पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेले आहे.