मुंबई ः बाॅलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेम प्रकरण कोणाला माहीत नसेल, असा माणूस सापडणे कठीण. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या रंजीतने एका मुलाखती त्यांच्या प्रेमाचा किस्सा आहे, हा किस्सा ऐकून आपल्याली त्यांची डोकदुखी कळू शकेल.
तर, किस्सा असा की… अमिताभ आणि रेखा एकमेकांच्या प्रेमात इतके बुडालेले होते की, रेखा फक्त अमिताभ बच्चन यांना भेटता यावे म्हणून चक्क शुटींग रद्द करत होती. रंजीत हे धर्मेंद्र आणि रेखा घेऊन ‘कारनामा’ नावाचा चित्रपट करत होते. आणि शुटींगची वेळ ही रात्रीची ठेवलेली होती. मात्र, रेखाला ही वेळ मान्य नव्हती.
रेखाने सकाळी शुटींग ठेवावे म्हणून विनंती केली. मात्र, रंजीत ऐकायला तयार नव्हते आणि रेखा ऐकण्यास तयार नव्हती. कारण, रात्री वेळ अमिताभ बच्चनसोबत घालवता यावा म्हणून रंजीत यांच्या चित्रपटाच्या रात्रीच्या शुटींग तयार नव्हती. अखेर यावर तोडगा म्हणून धर्मेंद्रने रेखाला बदलून दुसऱ्या हिरोइनला घेण्याचा सल्ला घेतला.
रंजीत यांनी कसल्याही परिस्थितीत शुटींग पूर्ण करायचे होते. त्यामुळे रेखाला बदलून त्यांनी फराहची निवड केली आणि इतकंच नाही तर, धर्मेंद्रला ही बदलून विनोद खन्ना घेतले. शेवटी ‘कारनामा’ चित्रपट पूर्ण केला.