मुंबई ः अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘आदिपुरूष’ येत आहे, याच पार्श्वभुमीवर सैफने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत ‘रावणा’ भाष्य केले होते. त्यावर तो ट्रोल आणि वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र, त्याने केलेले व्यक्तव्य मागे घेतले आहे.
वायरल बियानी या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याचा माफिनामा मांडण्यात आला आहे. सैफ म्हणतो की, ”माझ्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला. मी अनेकांच्या भावना दुखविल्या असल्याची जाणील झाली आहे. भावना दुखविण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी सर्वांची माफी मागतो आणि केलेले विधान मागे घेतो”
‘रावणा’बद्दल सैफ काय म्हणाला होता…
आदिपुरूष या चित्रपटात सैफ रावणाची भूमिका साकाणार आहे. दरम्यान, यावर भाष्य करताना सैफने म्हणाला की, ”रावणाला आपण केवळ खलनायकाच्या भूमिकेत पाहिले आहे. परंतु, तो खलनायक नव्हता. तोदेखील एख माणूस होता. तो नेमका कसा माणूस होता, याचं चित्रण आदिपुरूष चित्रपटात पाहायला मिळेल. रावणालादेखील एक पार्श्वभूमी होती. लक्ष्मणाने सुर्पनखाचे नाक कापले होते, त्यानंतर हे युद्ध होणारच होते. या चित्रपटात रावणाची विचारसरणी काय होती, हे दाखविले जाणार आहे.