हिंदुस्थानलाही लवकरच ‘फायझर’ची करोना लस

0

नवी दिल्ली : ब्रिटनप्रमाणेच हिंदुस्थानलाही लवकरच फायझरची करोना लस मिळणार आहे. या फार्मा पंपनीने लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग पंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे.

डीसीजीआयने ही परवानगी दिल्यास देशात सिरम इन्स्टिट्यूटच्या आधी फायझर इंडियाची लस येणार आहे. कोरोनाविरोधातील लढय़ात ही मोठी खूशखबर असेल. देशात लस विकसित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

त्याआधी परदेशातून फायझरने लस वितरणासाठी तयारी दाखवली आहे. देशात लसीची विक्री तसेच वितरणासाठी पुढे आलेली फायझर ही पहिली पंपनी ठरली आहे. पंपनीने विकसित केलेल्या लसीला नुकतीच ब्रिटन सरकारने मंजुरी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.