नवी दिल्ली ः दिल्ली पोलिसांनी शकरपूरमध्ये चकमकी दरम्यान ५ दहशतवाद्यांना पकडले. पकलेले दहशतवादी पंजाब आणि काश्मीरमधील आहेत. त्यांचा संबंध इस्लामिक आणि खलिस्तानशी आहेत, असे सांगितले जात आहे.
दिल्लीच्या विशेष पथकाचे पोलीस आयुक्त प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, ”५ दहशतवादी पकडण्यात आले आहेत. त्यात पंजाबचे २ आणि उर्वरित ३ काश्मीरशी आहेत. त्यांच्याकडे काही हत्यारे सापडलेली आहे. पकडलेल्या दहशतवाद्यांचा संबंध इस्लामिक दहशतवाद्यांची असल्याचे स्पष्ट होत आहे.”
या दहशतवाद्यांना आयएसआय वापरत होती, अशा पोलिसांनी माहिती दिली आहे. पण कोणात्या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत, याबद्दल फारशी मिळू शकलेली नाही. दिल्ली मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती आहे.