मुंबई ः ”भारत बंदाला पाठिंबा देणारे सत्ताधारी काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं शेतकरी प्रेम मूळात नकली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अद्याप पुरेशी मदत दिली नाही. दूध उत्पादकांना भाव मिळाला नाही. इतकंच नाही करोना काळात शेतकऱ्यांना कोणतीही मदत राज्य सरकारने केलेली नाही”, असा आरोप राज्य भाजपाचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी ट्विट करत केला आहे.
कृषी कायद्याविरोधात दिल्ली होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तसेच उद्या होणाऱ्या ‘भारत बंद’लादेखील उत्सुर्फपणे पाठिंबा द्यावा, असेही आवाहन केलेले आहे. त्यामुळे सरकारची कोंडी झालेली आहे.
तिन्ही पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर निशाषा साधालेला आहे. मागील ९-१० दिवसांपासून चिवटपणे केंद्राच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्ली आंदोलन छेडले आहे. केंद्राने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात हजेरी लावलेली आहे. केंद्राने आतापर्यंत चार वेळा बैठका घेतल्या, मात्र त्यामध्ये यश आलेले नाही.