लखनऊ ः उत्तरप्रदेशमधील विरोधी पक्षही कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. समाजवादी पक्षाने कनौजमधून ‘किसान यात्रा’ सुरु केली होती. यामुळे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादन यांना पोलिसांनी अटक केली आहे.
अखिलेश यादव यांच्या घरासमोर बॅरिकेड्स लावण्यात आली होती. म्हणून याच परिसरात धरणं आंदोलन सुरू करण्याचा निर्णय अखिलेश यादव यांनी घेतला. त्यानंतर अखिलेश यांना अटक करण्यात आली. त्यांना इको गार्डन इथं पाठविण्यात आलं असून त्यांनी कस्टडीमध्ये ठेवण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाने आपल्या गाड्या जप्त केल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी यावेळी केला.