मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी मुंबई लोकलमधून प्रवास करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कामानिमीत्ताने मुंबईत आलेल्या रोहित पवार यांनी अंधेरी ते मीरा रोड पर्यंत लोकलने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी मुंबईत असताना अनेकदा लोकलने प्रवास व्हायचा, असं म्हणत रोहित पवार जुन्या आठवणींमध्ये रमले. करोनाच्या संकटावर मात करत मुंबईची लाईफलाईन पूर्ववत होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.