”७/१२ वाचवायचा असेल तर, ८/१२ च्या भारत बंदमध्ये सहभागी व्हा”

0

मुंबई ः “भारत बंद हा शेतकऱ्यांचा आणि सामान्यांचा बंद आहे. मुठभर उद्योगपतींच्या फायद्यांसाठी भाजपा सरकार शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. आता भाजपाच्या पाठिशा रामही उभा राहणार नाही”, असे ट्विट काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहोब थोरात यांनी केले.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलकांनी जाहीर केलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.