मुंबई ः शेतकरी आंदोलनावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, ”शेतकरी हा अन्नदाता आहे. समजातील कोणत्याही घटकात जर असंतोष असेल तर त्यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढणे, ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे”, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.