मुंबई ः बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण केवळ भारतातच नाही तर, जगातील एक नामांकित अभिनेत्री आहे. जागतिक स्तरावर अभिमान वाटेल अशी कामगिरी तिने केलेली आहे. नुकतेच एथेंस इंटरनॅशनल एअरपोर्टवर दीपिकाचे कॅम्पेन दाखविण्यात आले. त्यामध्ये ‘द ऑथेंटिक स्माइल्स ऑफ पीपल ऑफ द वर्ल्ड’ दीपिकावर फीचर करण्यात आले आहे.
