पिंपरी : मित्राच्या वाढदिवसाला जायचा बहाणा करुन, तरुणीला बिअर मधून गुंगीचे औषध देऊन, डोंगरावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक दिघी येथे घडली आहे.
शनिवारी (दि. ५ डिसेंबर) घडलेल्या या घटनेबाबत संबंधित पीडित तरूणीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश कापुरे (रा. दिघी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाशने पीडित तरूणीसोबत जवळीक वाढवून तिचा विश्वास संपादन केला. तसेच मित्र विशाल पाटील याच्या वाढदिवसाला जायचे आहे, असे सांगून पीडितेला रिक्षात बसविले. त्यानंतर तिला घेऊन पुण्यातील शिवाजीनगर येथील प्रतीक बारमध्ये गेला. तिथे पीडितेला बिअर पाजली. त्यामुळे तिला गुंगी आली. त्यानंतर घरी सोडण्याच्या बाहाण्याने पीडितेला दिघी येथील डोंगावर नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. भोसरी पोलिस तपास करत आहेत.
Prev Post
Next Post