स्थायी समितीच्या भर सभेत राडा

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत भाजप नगरसेवकांनी राडा घातला आहे. चिंचवड मतदार संघातील भाजपच्या चार नगरसेवकांनी सभापतींच्या विरोधात हल्लाबोल करत सभागृहात तोडफोड केली. टेबलावरील माईकची आदळआपट करून झटापटीत ग्लास फोडण्यात आले असून अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे.

आज बुधवारी स्थायी समितीच्या सभागृहात प्रवेश करताना भाजपचे चिंचवड विधानसभा मतदार संघातील चार नगरसेवकांना सुरक्षारक्षकांनी आत जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर सभागृहात चिंचवड मतदार संघातील विकास प्रकल्पांच्या विषयावरून सभापती आणि त्या नगरसेवकांत चांगलीच हामरी तुमरी झाली.

सभापती संतोष लोंढे यांची भूमिका अक्षेपार्ह वाटल्यामुळे नगरसेवकांनी सभापतींच्या मनमानीविरोधात भरसभेत गोंधळ घालायला सुरूवात केली. सभापतींचा हा मनमानी कारभार कदापी चालू देणार नाही. भाजपच्याच नगरसदस्यांना सभागृहात प्रवेश करण्यास अटकाव करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न करत सभा कामकाज बंद पाडण्याचा इशारा दोघांनी दिला. दरम्यान, टेबलवरील माईकची तोडफोड केली असून ग्लास फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नगरसचिव उल्हास जगताप यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकारही घडल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.