मुंबई ः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांचा चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावली होती. ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं होतं.
टाॅप्स ग्रुप कंपनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने आमदार सरनाईक यांच्या घरावर धाड टाकलेली होती. तसेच त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आलं होतं. त्याचबरोबर पूत्र विहंग सरनाईक यांचीही ईडीच्या विभागीय कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.
बाहेरच्या देशातून आल्याने प्रताप सरनाईक हे विलगीकरणात गेले होते. त्यामुळे प्रताप सरनाईक चौकशीला गेले नव्हते. ईडीच्या या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलीच जुंपलेली होती. एकमेकांवर आरोप आणि टीका करण्यात आली होती.