मुंबई ः घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, नवरी नटली काल बाय सुपारी फुटली, अशा गाण्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचलेली कार्तिकी गायकवाड अखेर लग्नबेडीत अडकली. लाॅकडाऊनमुळे अनेकांची लग्नं थांबलेली होती. पुन्हा सर्व पूर्ववत झाल्यानंतर लग्नाचा सीजन सुरू झाला आणि मग सामान्यांबरोबर सेलेब्रिटींनीही आपपाली लग्न उरकायला घेतली.
कार्तिकीच्या साखरपुड्याचे फोटो लग्न जुलै महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकतेच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. मोजक्यात पाहुण्यांच्या उपस्थितीत पुण्यात कार्तिकीचे लग्न पार पडले. त्याचे फोटो गायिक आर्या आंबेकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
सारेगमप लिटिल चॅम्पमधून आपल्या आवाजाची जादू प्रेक्षकांवर टाकणारी कार्तिकी गायकवाडच्या पतिचे नाव रोनित पिसे आहे. तो व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनिअर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. रोनित पिसे पुण्यातील आहे. रोनितचे नातेसंबंध कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारीमधील आहेत.