आदित्य ठाकरेंवर ‘दिशा’ कायद्यावरून नितेश राणेंचा मार्मिक टोला

0

मुंबई : ”महाराष्ट्र सरकार शक्ती नवा कायदा आणत आहे, हे ऐकून आनंद झाला. परंतु, या कायद्याचं पूर्वीचं दिशा हे नाव बदलून शक्ती का ठेवण्यात आलं, हे समजू शकतो. आपले राज्य या कायद्यांतर्गत कारवाई करताना भेदभाव करणार नाही, अशी मला आशा आहे. अगदी युवा कॅबिनेटमंत्री जे एक संशयित आहेत. त्यांच्यासंदर्भात जरी खटला असला तरी त्याचा निकाल निपक्षपातीपणे निकाल दिला जाईल, अशी अपेक्षा आहे”, असा मार्मिक टोला नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर लगावला.

असा होणार आहे कायदा…

महिला व बालकांवरील अत्याचाराच्या तक्रारींवर सक्षमपणे कारवाई कराता यासाठी ‘शक्ती’ नावाचे दोन कायदे राज्य सरकार करणार आहे. महिला व बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये  आंध्रप्रदेश सरकारने ‘दिशा’ नावाचा कायदा केलेल्या आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार शक्ती कायदा तयार करणार आहे.

या कायद्यानुसार बलात्कार, ऍसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांसंदर्भात फाशीच्या शिक्षेची तरदूत प्रस्तावित केली आहे. त्याचबरोबर समाज माध्यमांवरून धमककी देणे, बदनामी करणे आणि खोट्या तक्रारी करणे, या नव्या गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.