कीर्ती रविकुमार पोटे (४३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रवी कुमार पोटे (५०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
अलंकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे दाम्पत्य डहाणूकर कॉलनीत मुलीसोबत राहतात. आज दुपारच्या सुमारास नवरा-बायकोमध्ये किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात कीर्ती कोथरूड बस स्थानक परिसरात आली होती.
पती रवीकुमारने तिचा पाठलाग करून छातीत चाकू खुपसला. गंभीर जखमी झालेल्या कीर्तीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.