जळगाव : खानदेशातील मोठे नेते म्हणून ओळख असलेले एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुले त्यांच्या अनेक समर्थकांना राष्ट्रवादी प्रवेश करायचा असेल पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून टर्म झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
खडसेंचे खानदेश समर्थक भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी व त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या दिवशी आपण लवकरच एकनाथराव खडसे यांच्या सोबत जाणार हे सोशल मीडिया व जाहिरातीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. त्या जाहिरातींमध्ये कुठेही गिरीश महाजन किंवा भाजपच्या मोठ्या नेत्यांचे छायाचित्र नाही.
काही ठिकाणी खासदार रक्षा खडसे, एकनाथ खडसे यांचे छायाचित्र आहे. यावरून असे दिसते की खडसे कट्टर समर्थक व भाजपचे विद्यमान आमदार हे लवकरच आपल्या स्वगृही परतणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या समर्थकांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हेच सांगितले आहे. भुसावळ नगरपालिकेवर येत्या काळात महाविकास आघाडीचा झेंडा फडकण्याचे संकेत मिळत आहेत.