मुंबई ः ”आंदोलक शेतकऱ्यांसोबत केंद्राने सुरू केली. चर्चा करताना शेतकऱ्यांनी काही चर्चा सुचविल्या. सरकारने त्या मान्य केल्या आणि नंतर शेतकऱ्यांनी लेखी आश्वासन मागितलं, तेही मोदी सरकारने मान्य केलं. पुन्हा शेतकऱ्यांनी कायदे रद्द अशी भूमिका घेतली. याचा अर्थ असा की, आंदोलकांमध्ये एक समूह असा आहे की ज्याला मार्गच काढायचा नाही. नेमके अशी भूमिका घेणारे नेमके कोण आहेत, हे शोधलं पाहिजे”, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आंदोलनात कशाप्रकारचे लोक पोहोचले आहेत, हे आपण पाहिले आहेत. तेजस्वी यादव यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. परंतु, बिहारने तर अगोदरच एपीएमसीच रद्द केल्या आहेत. ही कायद्यात तरदूत नाही तरीही ते विरोध करीत आहेत. आंदोलक चुकीचे आहेत, त्यांचा मार्ग योग्य नाही, असं मला म्हणायचं नाही. मात्र, काही लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की, हे आंदोलन सुरूच राहावं”, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.