पुणे ः करोनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंबंधी निघालेला गाडी मोर्चा याला पोलिसांनी प्रतिबंध घातला घातला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आंदोलनाला ताकदीने पुढे नेण्यासाठू मुंबईतील आझाृद मैदान येथे १४ ते १५ डिसेंबर रोजी स्थगिती आदेशाच्या अगोदर नियुक्तीच्या प्रतिक्षात असेलेले ईएसबीसी आणि सीईबीसी मराठी उमेदवार उपोषण करणार आहेत.
मराठा मोर्चातर्फे शुक्रवारी झालेल्या बैठकीत ज्या मागण्या करण्यात आल्या होत्या. त्या सोडविण्यासाठी विधिमंडळातील आमदारांनी हे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करावेत आणि ते सोडवावेत, असे आवाहन करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर २५ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत मराठा समाजातील शेवटच्या घटकांनी न्यायलयीन लढ्यात आणि आंदोलनाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करावे, असेही आवाहन करण्यात आले आहेत.