मुंबई ः विषयाची नाविण्यता पाहून चित्रपटाची निवड करणारा प्रसिद्ध अभिनेता आमीर खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. सध्या आमीर खानचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. अविनाश गोवारीकर याने आपल्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.
फोटोमध्ये आमीर खान हा काउचवर बसलेला आहे. आमीरने हातात सिगार घेऊन शर्टलेस फोटो काढलेला आहे. फोटोमध्ये आमीर आपले बॅकशोल्डर मसल्स फ्लाॅन्ट करत आहे. अविनाश गोवारीकरने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, ‘पॅकअपनंतरचा शाॅट आमीर खानसोबत’ या फोटोमध्ये आमीर खान कूल पर्सन दिसत आहे.
आमीर खानच्या विचार केला असता, लाल सिंह चढ्ढा या चित्रपटानंतर गुलशन कुमार यांची बायोपिक म्हणजेच ‘मुगल’ सिनेमाच्या शुटींगसाठी आमीर खान रेडी आहे. पुढच्या वर्षातील जून महिन्यांत या सिनेमाची शुटिंग सुरू होणार आहे.