पिंपरी चिंचवडमध्येही ३ जानेवारीपर्यंत बंदच राहणार शाळा

महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात अजुनही कोरोना विषाणूची भिती कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा व महाविद्यालय उघडण्यासंदर्भात कोरोना विषाणूच्या परिस्थितीचा आढावा घेवुन ३ जानेवारी २०२१ नंतर महापालिका हद्दीतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली आहे.

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १३ डिसेंबर पर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. सद्या पालकांची संमतीपत्र घेणे सुरु आहे. आत्तापर्यंत महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फक्त ११३२ संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. यामुळे तुर्तास शाळा सुरु करणे योग्य रहाणार नाही. या अगोदरच शासनाने स्थानिक पातळीवर यासंदर्भात निर्णय घेण्याचे शासन आदेशात नमूद केलेले आहे.

त्यामुळे शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेवूनच शाळा उघडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने, शाळा व महाविद्यालयातील ९ ते १२ वी चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड 19 आजाराबाबत चाचणी पुर्ण झाली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण, तापमान मोजणीसाठी गन, डिजिटल थर्मामिटर, हात धुण्याची व्यवस्था, सोशल डिस्टनसिंग प्लॅन इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे ३ जानेवारी २०२१ पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील शाळा बंदच रहाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.