पिंपरी : केंद्र शासनाने केलेल्या शेतकरी कायद्यास विरोध करण्यासाठी दिल्ली मध्ये 16 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे बेताल वक्तव्य खासदार आणि केंद्रीय नेते रावसाहेब दानवे यांनी केले आहे. या व्यक्तव्याचा निषेध पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या वतीने करण्यात आला असून त्यांच्या प्रतिमात्मक पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
दानवे यांना देशभरातील शेतकरी कधीही माफ करणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केंद्रीय मंत्री दानवे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी निलेश मुटके, धनंजय आल्हाट, सुरज लांडगे, सचिन सानप यांनी दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचातीव्र शब्दात निषेध नोंदवला
केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात हरियाणा आणि दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला शिवसेना भोसरी विधानसभेचा वतीने जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला.
चिखली येथील साने चौकात आज, शनिवारी साडे सकाळी अकराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.