टायगरला फॅनने घातली लग्नासाठी मागणी

0

मुंबई ः आपला डान्स आणि मार्शल आर्ट कलेचं प्रदर्शन करत चाहतांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणार टायगर श्राॅफ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कारण, त्याला एका चाहतीने टायगरला लग्नासाठी प्रपोज केला आहे. टायगरनेदेखील अफलातून उत्तर दिलं आहे.

टायगरने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथींग’ सेशन ठेवला होता. त्यात चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. एका चाहतीने त्याला चक्क लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर टायगर म्हणाला की, ”कदाचित काही वर्षानंतर, जेव्हा मी तुझा सपोर्ट करू शकेन. तोपर्यंत खूप शिकायचं आणि कमावायचं”, असं मनाला भिडणारं उत्तर टायगरने दिलं.

टायगरने चाहत्यांचा प्रश्नांना उत्तरं दिलीत. त्यामुळे चाहत्यांनाही एखादा स्टार आपल्याशी बोलतो आहे, याच्या मोठ्या तयार झाल्या. एका चाहत्याने दिलेल्या प्रश्नांवर उत्तरल देताना म्हणाला की, आपला परिवार आणि जीवनाविषयी त्याला त्याचं काम आणि ट्रेनिंग फार आवडतं.

Leave A Reply

Your email address will not be published.