पुणे : पुण्यातील वानवडी येथील रेसकोर्स मध्ये चालणार्या घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेणार्यांवर पुणे शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. वानवडी, कोंढवा आणि हडपसर परिसरात एकाचवेळी छापे टाकण्यात आले. बड्या बुकींसह तसेच खेळायला येणार्या 21 जणांना अटक करण्यात आले आहे. तसेच 10 मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, लॅन्डलाईन फोन आणि इतर ऐवज जप्त केला आहे.
बेटिंग प्रकरणी शब्बीर मोहसीन खंबाटी (रा. पद्मव्हिला सोसायटी, वानवडी), तन्मय दत्तात्रय वाघमारे (29, रा. फ्लॅट नं. 205, अर्चना मेडोज, लेन नं. जी, साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क), राकेश हणमंत कट्टमणी (रा. सर्व्हे नं. 66, ढोबरवाडी, घोरपडी गाव), गोपाळ गोविंद स्वामी (59, रा. 160 फिलीप चाळ), अविनाश दिलीप इंगळे (36), लडारस प्रभानंद हिरेकरू (47, रा. 66, ढोबरवाडी, घोरपडी गाव), नरेश शंकरदास मुलचंदानी (47, रा. शास्त्री अपार्टमेंट, कॉफी हाऊस जवळ, कॅम्प), खालीद सलीम मोहम्मद मेमन (72, रा. 717, भवानी पेठ, चुडामल तालीम जवळ, भदीया हॉटेलच्या शेजारी), मोहम्मद अब्दुल जाफर (76, रा. भंडारी बाग नारंगी मंजील, बोट क्लब रोड, बंडगार्डन), ताजमहोम्मद अहमद भगत (57, रा. एच. 19, महाराष्ट्र हौसिंग सोसा., येरवडा), कुमार गंगाराम चिकणे (55, रा. जावध वस्ती, भारत फोर्स कंपनी रोड, मुंढवा), विश्वास सावळाराम काठे (65, रा. 2015, लेन नं. 2, जय मल्हार नगर, सांगवी), प्रीतपाल रामकिशन गाढी (65, रा. इंद्रप्रभा, देहुरोड), रवी कुमार राजकुमार लांभ (30, रा. ढोबरवाडी), संतोष रघुनाथ चिट्टे (34, रा. बिबवेवाडी गावठाण, दत्त मंदिराजवळ), प्रकाश विठ्ठल कांबळे (66, रा. क्रीस्टल हाईट्स, ओमकार गार्डनचे मागे, कोंढवा), माहीन प्रभाकर हिरेकरू (49, रा. सदगुरू रेसिडेन्सी, बी.टी. कवडे रोड), शफी मोहम्मद शेख (रा. कौसरबाग, कोंढवा), मनोज वसंत पाल (40, रा. बी.टी. कवडे रोड, कृष्णानगर), रोहित प्रभु हिरेकरू (29, रा. घोरपडी गाव, ढोबरवाडी, वानवडी) आणि रविंद्र सोपान नेटके (31, रा. लेन नं. 5, जी, कोरेगाव पार्क, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
वानवडी येथील घोड्यांच्या रेस वर बेटिंग सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त पंकज देशमुख आणि त्यांच्या पथकाने छापे मारले. अशा प्रकारची कारवाई पुण्यात पहिल्यांदाच झाली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये अनेकांची फोननंबर मिळाले आहेत. त्यानुसार पोलिस तपास करणार आहेत.