अमिताभ बच्चन यांचा तरुणपणातील फोटो व्हायरल

0

मुंबई ः बाॅलिवुडचा महानायक अमिताभव बच्चन या वयातही सोशल मीडियावर सक्रीय असतात. इतकंच नाही, तर आपल्या चाहत्यांसोबत सतत बोलतही असतात. अमिताभ यांनी नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ते फोटो वेगात व्हायरल होताहेत.

अमिताभ यांनी स्वतःचा एक कृष्णधवल फोटो इन्स्टाग्रामवर टाकलेला आहे. त्या फोटोमध्ये ते तरुण दिसत आहेत. हा फोटो त्यांच्या शालेय जीवनातील प्रारंभीचे फोटो आहेत. या फोटोबरोबर त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

अमिताभ बच्चन यांनी फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”युवा की मासुमियत… अब परिपक्वता और जीवन की कठोरता से आगे निकस गई है… न जाने कहा गए वो दिन…” अमिताभ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, फोर्ब्सने काढलेल्या आशियातील सोशन मीडियावर प्रभावी असणाऱ्या १०० दिग्गजांच्या यादीत अमिताभ बच्चन यांचे नावदेखील आहे. अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करोना काळात रुग्णांच्या उपचारासाठी ५१ करोड रुपये गोळा करण्याचे काम केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.