अदर पुनावाला म्हणाले, ”जानेवारीमध्ये लसीकरणाची सुरुवात…”

0

मुंबई ः ”या महिन्यात अखेरीपर्यंत आम्हाला आपतकालीन वापरासाठी परवाना मिळण्याची शक्यता आहे. पण, व्यापक प्रमाणात लसीचा वापर करण्याचा मूळ परवाना नंतर मिळण्याची शक्यता आहे. तरीही मला विश्वास आहे की, जर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं मान्यता दिली, तर भारतात जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होऊ शकते”, अशा विश्वास सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी व्यक्त केला.

इकाॅनाॅमिक्स टाइम्स ग्लोबल बिझनेस समीटमध्ये अदर पुनावाला यांनी लसीसंदर्भात माहिती दिली. पुनावाला म्हमाले की, ”एकदा भारताला २० टक्के करोना लस मिळाली की, आपल्यामध्ये आत्मविश्वास व भावना पुन्हा परत येतील अशी आशा आहे. तसेच पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर  दरम्यान प्रत्येकासाठी लस उपलब्ध होईल आणि माणसांचं जीवन पूर्वपदावर येईल”, असंही पुनावाला यांनी म्हटलं आहे.

सीरम इन्स्टिट्यूटनसहीत तीन औषध निर्मिती कंपन्यांनी करोना लसीचा आपातकालीन वापारासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे अर्ज केले आहेत. यामध्ये फायजर, सीरम आणि भारत बायोटेक यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.