‘स्माईल’ टिकवून ठेवायची आहे… तर हे वाचा

0

दात आपल्या शरीरातील अगदी सिन्सेटिव्ह पार्ट. बऱ्याच जणांना दाताच्या तक्रारी असतात. एकदा का दात दुखायला लागले की, आपल्याला काही सुचत नाही. आपल्या दाढेला हात लावून बसावे लागते. कुणाचे दात किडलेले असतात, तर कुणाचे पिवळे पडलेले असतात. हे का होते, तर… आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो. त्याचा परिणाम आपल्या दातांवर नक्कीच होतो. कोणत्या पदार्थाने आपल्या दातांवर परिणाम होते, हे तपासून घेतले पाहिजे. निरोगी दातांसाठी कोणते पदार्थ खाऊ नयेत याची माहिती चला तर जाणून घेऊया… 

कॅन्डी (साखरेची गोळ्या-बिस्किटे) ः खूप गोड खाल्ल्यामुळे आपले दात लवकर किडतात. जर तुम्हा गोड खाणं आवडतं म्हणून तुम्ही सतत कॅन्डी खात राहिलात तर, तुमच्या दातांसाठी योग्य नाही. कारण, कॅन्डी खाल्ल्याने जीभेचा रंग बदलतोच, त्याचबरोबर दातांवरही त्याचे डाग राहतात. तर, आजपासून कॅन्डी खाण्यावर थोड्याशा मर्यादा घालून घ्या.

एनर्जी ड्रिंक ः एनर्जी ड्रिंक तुमच्या शरीरावरच परिणाम करतं असं नाही, तर ते दातांवरही परिणाम करतं. फूड एसीड घातलेले अन्न आणि पेयदेखील तुमच्या दातांना लवकर खराब करण्यास मदत करतात. एनर्जी ड्रिंक्स तुमच्या दातांच्या बाहेरील बाजूस खूप नुकसान करू शकते. आपल्या शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर नैसर्गिक ड्रिंक्सचे सेवन करा.

चहा : सतत चहा प्यायल्याने आपले दात बाहेरून खराब होतात आणि पिवळे पडायला लागतात. चहा पिणे सर्वांना आवडते मात्र, चहा दातांसाठी योग्य नाही. जर तुम्हाला दातांचे आरोग्य व्यवस्थित जपायचे असेल तर चहा पिणे थांबवा.

शितपेये ः सोडा, कोला आणि इतर साॅफ्ट ड्रिंक्स तुमच्या दातांना खराब करतात. कारण, त्यात वापरेली रसायने आपल्या दातांवर परिणाम करतात. तसेच दात पिवळे आणि कमजोरल होतात. त्याचबरोबर वय होण्याअगोदरच दात पडणे सुरू होते.

साॅस ः गडद रंग वापरलेले साॅस खाणे आपल्या दातांसाठी अपायकारक असू शकतात. सोया साॅस आणि टोमॅटो साॅस दातांवर परिणाम करतात. दातांना वाचवायचं असेल तर, हलक्या रंगाचे साॅस खा आणि खाल्ल्यानंतर लगेचच दात ब्रश करून घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.