शेतकरी आंदोलन आणखी तीव्र; उपोषण अन् धरणे धरणार

0

नवी दिल्ली ः मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन अजूनही धगधगतेच आहे. १४ डिसेंबरपासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील शेतकरी संघटनेचे नेते जिल्हाधिकारी कार्यालासमोर धरणे धरणार आहेत. तसेच सामुहिक उपोषणदेखील करणार आहेत.

शेतकरी नेते गुरनामसिंग चदुनी यांनी पत्रकार परिषेदेत याची माहिती दिली. काही संघटनांचा कायद्यांनी पाठिंबा आहे, मात्र आमचा त्या संघटनांशी काहीही संबंध नसून सरकारने कायदे मागे घ्यावेत, हीच आमची भूमिका आहे. जोवर कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर आमचे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका चदुनी यांनी मांडली.

अशा पार्श्वभूमीवर विविध राज्यातील शेतकरी नेत्यांनी सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे जाहीर केलेले आहे. शेतकरी आंदोलनाच्या चिघळत जाणाऱ्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पंजाबचे उपमहानिरिक्षक लखमिंदरसिहं जाखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. केंद्राला पत्र पाठवून त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.