जगाबरोबर भारतातही करोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, आनंदाची बाब ही आहे की, करोना लस येत्या काही दिवसांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे की, २०२१ च्या पहिल्या ३-४ महिन्यांमध्ये शक्यता आहे की आपण देशांतील नागरिकांना लस प्रदान करू शकू. त्यानंतर करोना लसीकरण अभियान सुरू होईल. सरकार पहिल्यांदा करोनासंबंधित जास्त जोखीम उचलणाऱ्या ६० करोड लोकांना लस देणार आहे. त्यासंबंधीची केंद्राची कशी तयारी सुरू आहे… ते जाणू घेऊ या…
निवडणूक यंत्रसामुग्रीचा वापर ः कोवीड-१९च्आ लसीकरण कार्यक्रमासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला देणाऱ्या तज्ज्ञ समितीतील वी. के. पाॅल यांनी समाचार एजेंन्सी राॅयटर्स यांनी माहिती दिली आहे की, करोना लस आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारत निवडणूक यंत्रसामुग्रीचा वापर करणार आहे. हा लसीकरण कार्यक्रम किमान ६-८ महिन्यांपर्यंत चालणार आहे. त्यासाठी देशभरात कोल्डस्टोरेज वापरण्यात येणार आहे.
राॅयटर्सने दिलेल्या माहितीनुसार वी. के. पाॅल यांनी केंद्राला सांगितले आहे की, २ ते ८ अंश सेल्सियस तपमानात लस तयार करण्यासाठी कोल्ड स्टोरेज बनविण्यात आले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, सरकार आघाडीवर असलेल्या चार करोना प्रतिबंधक लसींचा विचार करून तयारी करत आहेत. ही तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे.
‘सीरम इन्सिट्यूट, भारत बायोटिक, जायडस आणि स्पुटनिक-व्ही’ चार लसींसंदर्भात आपल्याला कोल्ड स्टोरेजची गरज आहे. भारतासाठी हे मोठे आव्हान अजिबात नाही. सद्यातरी फायजर-बायोएनटेकच्या लसीला इतर देशांनी मंजूरी दिलेली आहे. त्यांनी भारतातही परवानगी मागितलेली आहे. मात्र, सर्वात मोठी अडचण अशी आहे की, या लसीची साठवणूक करायची झाल्यास ० ते ७० अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची गरज आहे आणि भारतात त्याती कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे ही भारतासाठी उपयुक्त मानली जात नाही.
भारतासाठी सर्वात उपयुक्त अशी ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस मानली जात आहे. कारण, सामान्य तापमानात त्या लसीला ठेवू शकतो आणि त्याची किंमतही कमी आहे. सद्या जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती करणारी सीरम इन्स्टिट्यूट ही सर्वात जास्त या लसीचे उत्पादन करत आहे. भारतात या लसीला ‘कोवीडशिल्ड’ नावाने ओळखले लाॅन्च केले जाणार आहे.