ऐन हिवाळ्यात पडतोय पाऊस!

मुंबई, पुण्यासह अनेक भागात पावसाची हजेरी 

0

मुंबई ः मुंबईसहीत महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. मुंबई आणि ठाणे भागात सकाळपासूनच सुरू झालेल्या या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच गोची केली. ठाण्याच्या काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. तर, पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात सकाळी तुरळक स्वरुपाचा पाऊस पडला.

निसर्गाचे चक्र बिघडल्यामुळे ठरलेल्या महिन्यांमध्ये पाऊस पडत नाही, असे चित्र आहे. ऑक्टोबरमध्ये पूर्णतः गेलेला पाऊस आता नोव्हेंबर-डिसेंबर या ऐन हिवाळ्याच्या दिवसात पाऊस आपली हजेरी लावत आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरूच आहे. मुंबई उपनगरात अंबरनाथ, बदलापूर आणि पनवेल भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.
काही भागांत तुरळक पाऊस तर काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. तर, काही ठिकाणी धुके दाटलेले आहे. असे समिश्र स्वरुपाचे वातावरण सद्या राज्यात पाहायला मिळते आहे. यावरून निसर्गाच्या वातावरणात बदल घडत आहे असे दिसत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.