करोनाचा परिणाम ः भार्गवी चिरमुलेच्या काकावर आली कॅलेंडर विकण्याची वेळ 

0

मुंबई ः करोना महामारीमुळे खूप जणांच्या हातचे काम गेलेले आहेत. खूप जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. आजही अनेकांनी त्याच्या खूप त्रासदायक पणे मुकाबला करावा लागतो आहे. यामध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिचे काकादेखील सुटू शकले नाहीत. सद्या या काकांच्या फोटोसहीत एक पोस्ट फिरते आहे.

भार्गवीचे चुलक काका आणि त्यांची आत्या आर्थिक संकटांच्या सामना करत आहेत. सद्या ते पुण्यातील रस्त्यावर कॅलेंडर आणि उदबत्या विकत आहेत. त्यांच्याबद्दल स्वतः भार्गवीने शेअर पोस्ट करत त्यांना मदत करण्याचे आवाहान आपल्या चाहत्यांना केले आहे.

पोस्टमध्ये भार्गवीने लिहिले आहे की, ”हे माझे चुलत काका आणि आत्या आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखिची आहे. आत्मनिर्भर असल्याने कुटुंबियांकडून कोणतीही मदत ते घेत नाहीत.” सद्या भार्गवी चिरमुले मराठीतील आघाडीची कलाकार आहे. आयडियाची कल्पना, संदूक, धागेदोरे, अनवट अशा चित्रपटांमधून ती झळकलेली आहे आणि अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे.

इन्स्टाग्रामवर लिहिलेली पोस्ट अशी :

माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू……
हे आहेत
श्री. चिरमुले आजोबा
कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले त्यात यांचे देखील पण अनेकांनी शिकावी अशी यांची वयाच्या ८१ तही असलेली. जगण्याची जिद्द आणि लढाऊ वृत्ती…. हे आजोबा आपल्या 65 वर्षीय मूक-बधिर बहिणीसोबत सदाशिव पेठेतील एका वाड्यात रहातात. उदरनिर्वाहासाठी दोघेही बँकांमधून शेव, फरसाण वगैरे पदार्थ विकतात आणि रोज संध्याकाळी सदाशिव पेठेत एका स्टूलावर सर्व पदार्थ मांडून विकण्याचा प्रयत्न करतात. पण कोरोना आला आणि सोबत यांच्या आयुष्यात घेऊन आला मोठ्ठे प्रश्नचिन्ह? बँका चालू होत्या, चालू आहेत. आजोबांची बँकेत जाऊन पदार्थ विकण्याची तयारीही आहे. पण बँकेतले कर्मचारी आजोबांना आता येऊ देत नाहीत, अर्थात स्वतःच्या आणि आजोबांच्या काळजीपोटी. पण आता करायचे काय ? चिरमुले आज्जी आजोबा या पदार्थांसोबत कधी उदबत्ती, कधी वाती, कधी पंचांग विकायला आणतात. आता आजोबांनी कॅलेंडर विकायला ठेवली आहेत. आपल्या सर्वांना एक आवाहन आहे. कॅलेंडर तर आपण कोठून तरी घेणारच. मग आपल्या नवीन वर्षाची सुरुवातच एका चांगल्या कामाने झाली तर? आपण घ्या आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा. आपल्यासाठी असलेलं ‘कॅलेंडर’ कोणाच्यातरी जगण्याचा आधार बनू शकेल…
– संतोष सुबाळकर

Leave A Reply

Your email address will not be published.