”उचलली जीभ लावली टाळ्याला”

काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणावर दिले स्पष्टीकरण

0

मुंबई : ”मराठा आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षनेते बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. या मुद्द्यावर त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे”, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षावर केली.

मराठा आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षाकडून समाजाची दिशाभूल सुरु आहे. समाजाला वस्तुस्थितीचा विपर्यास करून धादांत खोटी माहिती दिली जात आहे. या मुद्द्यावर सरकार अपयशी ठरले, असे जे म्हणातात याचा अर्थ सरकारी वकिलावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. मूळात फडणवीस सरकारच्या काळातच न्यायालयात मराठा आरक्षणसंबंधी बाजू मांडणारे वकील नेमले गेले होते. मग, फडणवीस सरकारने नेमलेले वकील हे क्षमता नसलेले वकील नेमले म्हणायचे का? परंतु आम्ही असले आरोप करणार नाही. कारण, वस्तुस्थिती तशी नाही. सरकारी वकिलांनी अतिशय उत्तमपणे बाजू मांडली आहे”, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना सांगितले होते की, आपले सरकार न्यायालयात टिकेल असा कायदा करीत आहे. मग, त्याच कायद्यावरून आजचे पेच निर्माण झाले म्हणून आम्ही नामाविराळे व्हायचे का, असा प्रश्न अशोक चव्हाणांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.