मुंबई ः राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून १५ जानेवारी २०२१ रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायचीच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली दिसत आहे.
या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील ताकदीने उतरणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा, असा आदेशच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या जिल्हा अध्यक्ष, उप जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांना दिलेला आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, भाजपा, शिवसेना यांच्याबरोबर मनसेदेखील संपूर्ण तादकीनिशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
१५ जानेवारी ः निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे
२३ ते ३० डिसेंबर ः उमेदवारी अर्ज भरण्यात मुदत
३१ डिसेंबर ः उमेदवाराच्या अर्जाची छाननी
४ जानेवारी : उमेदवारा माघार आणि चिन्ह वाटप
१५ जानेवारी ः प्रत्यक्ष मतदान (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
१८ जानेवारी ः मतमोजणी
२१ जानेवारी ः निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध