आंनदाची बातमी! लसीकरणाला सुरुवात होणार
केंद्राने राज्यांना लसीकरण मोहिमेसंदर्भात दिल्या मार्गदर्शक सूचना
मुंबई ः केंद्राकडून राज्यांना लसीकरण माहिमेसंदर्भात प्रत्यक्ष मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्णाला लस दिल्यानंतर ३० मिनिटे डाॅक्टरांच्या देखरेखाली ठेवले जाईल, एका वेळी एकाच वक्तीला लस आणि दररोज एका सत्रात १०० ते २०० लोकांचे लसीकरण, अशा प्रमुख मार्गदर्शक सुचनांचा करोना लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.
लसीकरणाच्या मार्गदर्शक सूचना राज्यांना नुकतीच पाठविण्यात आली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी फक्त नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लस टोचली जाईल आणि लसीकरण ठिकाणी कोणतीही नोंदणी केली जाणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. आधी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लस टोचताना ‘कोविड व्हॅक्सिन इन्टेलिजन्स नेटवर्क’ अर्थात को-विन या डिजीटल यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. तसेच सुमारे पहिल्या फेरीत जवळपास ३० कोटी लोकांना लस टोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोविड-१९ च्या विविध लसींची सरमिसळ होऊन नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यासाठी एकाच कंपनीची लस देण्यात यावी, लसवाहक, लसीच्या कुप्प्या आणि कोल्ड स्टोरेज यांच्या सूर्य प्रकाशाशी थेट संबंध येऊ नये, यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात, लाभार्थी लसीकरण केंद्रापर्यंत करोनाची लस ही डायल्युअंट म्हणजेच तीव्रता कमी करणारे द्रव हे लसवाहकामध्ये झाकणबंद अवस्थेत ठेवले जावे, लसींच्या कुप्यांवर वैधता मुदत कदाचित नसेल, मात्र ती लस वापरु नये, असं नाही, आणि शेवटी लसवाहक आणि न वापरलेल्या किंवा न उघडलेल्या लसींच्या कुप्या वितरण केंद्राकडे परत पाठवाव्यात, अशा सर्व सूचना मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.
लसीकरण केंद्र कसे काम करेल?
१) लसीकरण टीममध्ये ५ जणांचा समावेश असेल.
२) आरोग्य कर्मचारी, लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण.
३) ५० वर्षांवरील नागरिकांना प्रथम प्राधान्य, त्यातही वयवर्षे ५०-६० आणि ६० वर्षांपुढील, असे दोन गट असतील.
४) लाभार्थ्याचं वय पडताळून पाहण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांचा आधार घेतला जाणार आहे.
नावनोंदणी कशी कराल?
लसीकरणासाठी लाभार्थ्याला स्वतः को-विन (कोविड व्हॅक्सिन इन्टेलिजन्स नेटवर्क) या यंत्रणेवर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी १२ फोटो असलेल्या ओळखपत्रांची यादी देण्यात आली आहे. त्यात मतदार ओळख पत्र, आधारकार्ड, ड्रायव्हींद लायसन्स, पासपोर्ट, निवृत्तीवेतन कागदपत्रे आदींचा समावेश आहे.