मुंबई ः राज्यात करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ९३.५४ टक्के झाला आहे. सोमवारी ४६१० रुग्ण करोना मधून बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचबरोबर ६० रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मागील काही दिवसांतील करोनासंबंधीची आकडेवारी पाहता सोमवारी आलेल्या आकडेवारीवरून करोना रुग्णाचा आकडा खाली आलेला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होताना दिसत आहे. करोनामुक्तीचे प्रमाण हे करोनामृत्यूपेक्षा जास्त आहे.
… अशी आहे सद्याची आकडेवारी
सोमवारी ४ हजार ६१० रुग्ण करोमानुक्त झाले आहेत, तर २ हजार ९४९ रुग्ण नव्याने सापडले आहेत. आतापर्यंत राज्यातील करोना रुग्णांची संख्या ही १७ लाख ६१ हजार ६१५ इतकी झालेली आहे. तर, रुग्ण बरे होण्याची रिकव्हरी रेट ९३.५४ इतका आहे. तसेच आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४८ हजार करोना चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यातील १८ लाख ८३ हजार ३६५ करोना पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यातील ५ लाख ४ हजार ४०६ रूग्ण होम क्वारंटाइन झालेल्या आहेत. तर, रुग्णालयात ४ हजार ३३५ रुग्ण क्वारंटाइन झालेल्या आहेत.