दामिनी पथकामुळे दीड महिन्याच्या बाळाचा जीव वाचला

0
पुणे : पतीने दुसरे लग्न केल्याने नशा केलेल्या महिलेने पोटच्या दीड महिन्याच्या बाळाला पिशवीत कोंबून वरुन गोदडी टाकली. दरम्यान पोलीस ठाण्यातील दामिनी पथक वेळेवर पोहचल्याने बाळाचा जीव वाचला.

नवऱ्याने दुसरे लग्न केल्यामुळे संतापाच्या भरात महिलेने नशा करून बाळाला पिशवीत घातले होते. त्यावर गोधडी टाकून महिला रविवारी सकाळी दहाच्या सुमारास रस्त्याने फिरत होती. हडपसरमधील नागरिकांना ही महिला दिसल्यानंतर त्यांनी पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षाने हडपसर मुंढवा दामिनी मार्शलला घटनास्थळी रवाना होण्याचे सांगितले.

दामिनी नीलम पाचंगे आणि सारिका घाडगे अवघ्या 10 मिनीटांमध्ये मंतरवाडी चौकात पोहचल्या. त्यावेळी त्यांना महिला दिसून आली. त्यांनी तिच्या हातातील पिशवी घेत गोधडी बाजूला केली. त्यावेळी दीड महिन्याचे बाळ पिशवीत गुदमरल्याचे टाहो फोडत होते. दामिनी नीलम आणि सारिका यांनी क्षणाचाही वेळ न लावता बाळाला पिशवीतून बाहेर काढले. त्याला हाताने स्वच्छ करीत मायेचा उबारा दिला.

महिलेलसह बाळाला हडपसर पोलीस ठाण्यात नेले. परिसरातील एका खासगी रूग्णालयात नेउन बाळावर उपचार केले. पोलिसांनी महिलेच्या भावाला चांबळी (पुरंदर) येथून बोलावून घेत बाळाला ताब्यात दिले. तोपर्यंत नशा केलेल्या महिलेला शुद्ध आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.