प्रियंका चोप्रा हिचा कॅज्युअल लूक व्हायरल

0

मुंबई ः बाॅलिवुडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या अनोख्या वेशभूषेने कायमच चर्चेत असते. यावेळी तिने इन्स्टाग्रामवर कॅज्युअल लूक देत एक फोटो शेअर केला आहे. प्रियंका या फोटोमध्ये निळ्या रंगाच्या जिन्स आणि पांढऱ्या रंगाच्या टाॅपवर दिसत आहे. तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”ब्ल्यू जीन बेबी”. येथे प्रियंका स्वतःला ब्ल्यू जीन बेबी म्हणवून घेत आहे. या फोटोवर अभिनेता हृतिक रोशननेदेखील काॅमेंट्स दिली आहे.

आतापर्यंत प्रियंकाच्या फोटोला  १० लाखांहून जास्त लोकांनी लाईक्स मिळालेल्या आहेत. त्यामध्ये हृतिकने क्या बात है, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याचबरोबर राजकुमार राव, रोहित सराफ यांनीदेखील काॅमेंट्स दिलेली आहे. प्रियंकाबद्दल चाहत्यांनी खूप प्रेम दाखविलेले आहे.

प्रियंका चोप्राचा आगामी हाॅलिवूडची ‘टेक्स्ट फाॅर यू’ या चित्रपटाची शुटिंग करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक जिम स्टाउस आहे. या सिनेमा जर्मन भाषेत आलेल्या ‘एसएमएस फर डीच’ याचा इंग्रजी रिमेक आहे. या चित्रपटाची कथा लेखक सोफी क्रॅमर यांच्या कादंबरीवर आधारीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.