उद्धव ठाकरे म्हणाले, ”मी हे रेकाॅर्डवर सांगतो की, मराठा आरक्षणाला…”

0

मुंबई ः ”मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीका सुरू केली आहे. मराठी समाजाला आरक्षण देताना इतरही समाजाचं आरक्षण कमी जाणार, असे आरोपही करण्यात आले. मात्र, हे सर्व आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावले आहेत. ”मराठा समाजाला आरश्रण देताना इतर समाजांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावला जाणार नाही, हे मी अतंत्य जबाबदारीने आणि रेकाॅर्डवर सांगतो आहे”, असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडले.

”मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. आरक्षणासाठी चाललेली सरकारची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि ही लढाई आम्ही जिंकणारच”, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ठाकरे पुढे म्हणाले की, ”विरोधकांच्या सर्व आरोपांना उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. माझ्या सहकारी मत्र्यांनी त्यांच्या आरोपांनी योग्य ती उत्तरं दिली आहेत. तरीही तुम्ही आमच्या मानमगुटीवर बसण्याचा प्रयत्न करत असाल, त्याला आम्ही काहीही करू शकत नाही”, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत ही तर मुनगंटीवार यांची इच्छा असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. मागील काही दिवसांमध्ये अनेक जण आमच्या कुंडल्या काढत होते. सरकार पडणार हे पुन्हा पुन्हा सांगत होते. पण, सरकार काही पडत नाही म्हटल्यावर ते आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षांवर फटकेबाजी ठाकरेंनी केली.
Leave A Reply

Your email address will not be published.