जबाबदार व सज्ञान नागरिक बनावे : डॉ. सागर कवडे

0

पिंपरी : नकळत घडलेल्या एखाद्या गुन्हाचे विपरित परिणाम बालकांच्या शिक्षण, रोजगार व अन्य ठिकाणी घडतात. त्यामुळे त्यांनी आपली शक्‍ती योग्य मार्गाला लावून चांगले जबाबदार व सज्ञान नागरिक बनावे, असे आवाहन पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. सागर कवडे यांनी केले.

बाल वयात दिशा भरकटलेल्या मुलांसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ओटा-स्किम परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात 14 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 148 बालकांनी आपला सहभाग नोंदविला.

पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. सागर कवडे यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन केले.

मानसोपचार तज्ञ डॉ.राजीव नगरकर यांनी सर्व मुलांचा नेमका कल ओळखून समुपदेशन करून त्यांचे आवडीच्या क्षेत्रात करिअर कसे घडवता येईल याबाबत त्यांना मार्गदर्शन केले.

स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारे अनेक यशस्वी उद्योजक झोपडपट्टी भागतून घडले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हीही एक यशस्वी उद्योजक घडू शकता या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमचे व्यवस्थापक तुषार शिंदे यांनी उपस्थित मुलांना केले.

याशिवाय सिटीझन फोरमचे अविनाश चिलेकर, विमल फाउंडेशनचे विल्यम साळवे यांनीही उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे नियोजन निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस अमंलदार कपिलेश इगवे, अमोल मुठे, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमचे ऋषिकेश तपशाळकर, सुर्यकांत मुथीयान यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.