पाहिजे असणारे 250 गुन्हेगार अटकेत; 5 पिस्तुले जप्त

पुणे पोलिसांकडून एकाच वेळी अनेक ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन

0

पुणे : पुणे शहर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून 1 हजार 300 गुन्हेगार तपासले यावेळी पाहिजे असणाऱ्या अडीचशे गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तर बेकायदेशीर 5 पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी मंगळवारी रात्री नउ ते एक वाजेपर्यंत कोम्बिंगऑपरेशन राबविले. गुन्हे शाखेच्या पाच पथकातील अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी शोध मोहिम राबविली. तसेच 1300 जणांना आरोपींना ताब्यात घेतले.

खंडणी विरोधी पथकाने आर्मअ‍ॅक्टनुसार १४२ गुन्हेगारांची कुंडली तपासली आहे. त्याशिवाय विविध टोळीतील ३२८ गुन्हेगारांना तपासले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने पिटा अ‍ॅक्टनुसार १५ जणांना तपासले आहे. दरोडा वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने ४९ वाहनचोर तपासले असता, त्यामध्ये १० गुन्हेगार मिळून आले. जबरी चोरीतील २ गुन्हेगार मिळून आले. शरिराविरूद्धच्या गुन्ह्यात ६ गुन्हेगार मिळून आले आहेत. त्याशिवाय बिबवेवाडीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

तडीपार असतानाही शहरात वास्तव्य भोवले तडीपार काळातही शहरात आलेल्या ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये गुन्हे शाखेने ६ केसेस केल्या आहेत. शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या २१ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीसी १५१ (१)कलमानुसार १६२ गुन्हेगारांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.