नवी दिल्ली : देशातील सर्व टोल नाके कॅशलेस करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे १ जानेवारी २०२० पासून विना फास्टॅग लावलेल्या गाड्या टोल लेनवरुन गेल्या तर त्यांना दुप्पट टोल द्यावा लागू शकतो.
टोलवरुन जाणाऱ्या गाड्यांच्या आकड्य़ावरुन स्पष्ट होतंय की अजूनही २५ टक्के गाड्या विना फास्टॅग जात आहेत. टोल नाक्यावर लोकांना फास्टॅगसंबंधी जागरुक केले जाईल. टोल नाक्यावर खासगी एजेंसीचे प्रतिनिधीही उपस्थित राहतील, जे फास्टॅगची औपचारिकता पूर्ण करतील.
काही बँकांनीही आपले कॅम्प उभे केले आहेत. टोक नाक्यावर दोन लेन विना फास्टॅग असणाऱ्या गाड्यांसाठी सोडण्यात आले आहे. अशा पद्धतीने टोल नाक्यांवरही सर्व लेन फास्टॅगचे केले जाणार आहेत.