३ कोटी लोकांना प्रथम लस मिळणार

0

मुंबई ः राज्यात करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोनाची लस ३ कोटी लोकांनी देण्यात येईल. त्यादृष्टीने राज्यभरात कोल्डचेन उभी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासंदर्भात केंद्राकडून एसएमएस टप्प्याटप्प्याने येतील, त्यानुसार संबंधित रुग्णांना लस देण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांनी दै. लोकमतशी बोलताना ही माहिती दिली. केंद्राने ‘को-विन’ अ‍ॅप  तयार केले आहे. केंद्राने राज्याकडून माहिती मागितली आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर्स, डाॅक्टर्स, नर्सेस, अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी पहिल्यांदा लस दिली जाणार आहे. केंद्राने मागितलेली माहिती राज्याने अ‍ॅपवर अपलोड केली आहे.
ज्यांनी प्रथम लस देण्याची गरज आहे, अशानांच लस प्रथम दिली जाईल, त्यासाठी माहिती केंद्रांने तयार केलेल्या अ‍ॅपवर भरावी लागेल. नोंद झाल्यानंतर संबंधितांना कोणत्या भागाग दिली जात आहे, याचे मेसेज येतील आणि ते मेसेज व ओळखपत्र दाखविल्यानंतर लस दिली जाणार आहे. कुणीही दबावतंत्राचा वापर करून नये, त्याचा काही उपयोग होणार नाही, अशी महत्वाची माहिती टोपे यांनी दिली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.